वर्तमानपत्राविषयी निबंध | essay on newspaper in marathi2023
वर्तमानपत्राविषयी निबंध | essay on newspaper in marathi2023
आजच्या काळात जगामध्ये कोणतीही घटना घडली तरीही त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या जवळ त्याची संपूर्ण माहिती येते. आजच्या या लेखामध्ये आपण वर्तमानपत्राविषयी निबंध ( essay on newspaper in marathi) जाणून घेणार आहोत. हे सर्व फक्त वर्तमानपत्रामुळे शक्य झाल आहे. आत्ताच्या काळात वर्तमान पत्राशिवाय जीवनाची कल्पना करणे खूप कठीण आहे. आता ती एक पहिली आवश्यक वस्तू बनली आहे, ज्याला आपण दररोज सकाळी पहिल्यांदा पाहतो. वर्तमानपत्र आपल्याला जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती देण्यास मदत करतो आणि त्यामुळे आपण वर्तमान काळात जगत आहोत याची आपल्याला कल्पना होते.
र्तमानपत्रांमध्ये व्यापार, राजकारण, सामाजिक मुद्दे, बेरोजगारी, खेळ, आंतरराष्ट्रीय बातम्या, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, सण, तंत्रज्ञान इत्यादींची माहिती मिळते. वर्तमानपत्र विज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांची जागरूकता वाढविण्यासाठी मदत करते.
प्रस्तावना (Introduction on essay on newspaper in marathi)
आज काल वर्तमानपत्र ही एक जीवनाची गरज बनली आहे. वर्तमानपत्र सर्वांसाठी आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपल्या दिवसाची सुरुवात ताज्या घडामोडी आणि सुचना बरोबर करणे खूप चांगले असते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. हे बाजारामध्ये जवळ जवळ सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
एक वर्तमानपत्र बातम्यांचे प्रकाशन असतं जे कागदावर छापले जातात, आणि लोकांच्या घरांमध्ये वितरण केले जातात. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत. वर्तमानपत्र आपल्याला देशामध्ये होणाऱ्या सर्व घटना बरोबर जगामध्ये होणाऱ्या घटनांची ही माहिती देतो... वर्तमानपत्र आपल्याला खेळ, धर्म, समाज, अर्थव्यवस्था, चित्रपट, उद्योग, आहार, नोकरी इत्यादीविषयी सुद्धा माहिती देतो. भारत देशाचा नागरिक होण्याच्या नात्याने आपण आपल्या देशामध्ये आणि दुसऱ्या देशामध्ये होणाऱ्या सर्व घटना आणि वाद यांच्या विषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वर्तमानपत्र आपल्याकडे दररोज सकाळी येतं आणि याला वाचल्यानंतर आपल्याला खूप सारी माहिती मिळते. वर्तमानपत्र दररोज आपल्या वाढत्या महत्त्वामुळे सर्व क्षेत्रांमध्ये प्रसिद्धीस आहे. मग ते क्षेत्र मागासलेल असो किंवा विकास झालेला असो. वर्तमानपत्र विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वर्तमानपत्र सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी किंवा स्पर्धा पास होण्यासाठी आपली मदत करतो.
वर्तमानपत्र काय आहे
वर्तमानपत्र आपल्याला संस्कृती परंपरा कला पारंपारिक नृत्य आणि अनेक गोष्टींविषयी माहिती देते. आजच्या आधुनिक काळात कोणत्याही व्यक्तीला आपल क्षेत्र किंवा नोकरी शिवाय दुसरं काहीही जाणून घेण्यासाठी वेळ नाही. अशा वेळेला वर्तमान पत्र आपल्याला सण-उत्सव, जत्रा, संस्कृती, कार्यक्रम यांचा दिवस व तारीख सांगते. वर्तमान पत्र आपल्याला जगातील सर्व वस्तूंविषयी अगदी सहज आणि सोप्या भाषेत माहिती देते.
वर्तमानपत्राचा इतिहास
.jpeg)

Comments
Post a Comment